कर्मवीरांनी १९४० मध्ये महाराजा सयाजीराव विद्यालय, सातारा हे पहिले माध्यमिक विद्यालय स्थापन केले या विद्यालयात मा.डॉ. अनिल पाटील यांच्या प्रेरणेने जून १९९५ पासून "निवासी गुरुकुल प्रकल्प" सुरू झाला. एक तुकडी आणि सदतीस विद्यार्थ्यांच्या संख्येवर सुरू केलेला हा प्रकल्प वटवृक्षाप्रमाणे विस्तारला गेला. यामध्ये इ. ८ वीच्या निवासी गुरुकुल तुकडीच्या प्रवेशासाठी इ.७ वी मधील अभ्यासक्रमावर आधारित ऑनलाईन प्रवेश परीक्षा घेण्याची प्रक्रिया राबविण्यात येते. यासाठी प्राश्निकांकडून प्रश्नपेढी तयार करून घेण्यात येते. त्याचे डिटीपी करून अंतिम चार प्रश्नपत्रिका तयार करून ऑनलाईन परीक्षा घेतली जाते. या निवासी गुरुकुल प्रकल्पाचे अल्पावधीत यश पाहून सातारा शहराच्या परिसरातील पालकांच्या आग्रहास्तव जून १९९८ पासून महाराजा सयाजीराव विद्यालय, सातारा मध्ये इ.५ वी ते इ.८ वी या वर्गासाठी " अनिवासी गुरुकुल प्रकल्प " सुरु केला. इ.४ ते १० वी ब्रीज कोर्स, फाऊंडेश कोर्ससह इ. ४ थी ते १० वी एकूण १०४ विविध प्राश्निकांच्याकडून तयार करून घेवून त्याची प्रुफ करून छपाई झालेवर विभागीय कार्यालयामार्फत सर्व शाखांना पाहोच करून परीक्षा घेतल्या जातात. या परीक्षेस यावर्षी १ लाख ८० हजार विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. संस्थेच्या अविकसित व दुर्गम भागांतील काही शाखांची विद्यार्थी संख्या कमी आहे व ज्या शाखांची आर्थिक परिस्थिती सक्षम नाही अशा संस्थेच्या माध्यमिक १११ व आश्रमशाळा ८ अशा एकूण ११९ शाखांमध्ये जानेवारी २०१५ पासून " मिनी गुरुकुल प्रकल्प " सुरू करण्यात आला. सदर मिनी गुरुकुल शाखांना रयत शिक्षण संस्थेच्या सर्व प्रशासकीय विभागाकडून व कर्मवीर विद्याप्रबोधिनीकडून शैक्षणिक स्वॉप्टवेअर, विज्ञान साहित्य, खेळ साहित्य, ग्रंथालय पुस्तके, गुरुकुल फाईल इ. बाबी मोफत पुरविल्या जातात. सन २०१९ पर्यंत या रयत शिक्षण संस्थेच्या बहुतांशी शाखांमध्ये अनिवासी गुरुकुल प्रकल्प कार्यरत झाला होता. निवासी व अनिवासी गुरुकुल प्रकल्पातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीतील यश पाहता या प्रकल्पापासून वंचित राहिलेल्या प्रज्ञावान विद्यार्थ्यांना अशा प्रकारचे मार्गदर्शन मिळवून देण्यासाठी जून २००४ पासून पायलट प्रोजेक्ट म्हणून रयत शिक्षण संस्थेच्या मध्य विभागात "दूरस्थ गुरुकुल प्रकल्प " सुरू करण्यात आला होता.