Rayat Shikshan Sanstha Logo

रयत शिक्षण संस्था

"स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद" - कर्मवीर

प्रकल्प

सर्व प्रकल्प

रयत शिक्षण संस्था, सातारा

कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence)

रयत शिक्षण संस्थेचे माध्यमिक, उच्च माध्यमिक व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना नवीन तंत्रज्ञानाची व आधुनिक काळाची गरज ओळखून संस्थेने ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक माहिती तंत्रज्ञानाचे प्राथमिक शिक्षण मिळावे या उद्देशाने धोरणात्मक निर्णय घेऊन शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये जून 2025 पासून कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) हा अभ्यासक्रम सर्व शाखांमध्ये प्रभावीपणे सुरू केला आहे.

कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करीत असलेल्या सिम्यु-सॉफ्ट टेक्नॉलॉजी, पुणे या कंपनीमार्फत संस्थेतील लीड ट्रेनर यांना या अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. तसेच सिम्यु-सॉफ्ट टेक्नॉलॉजी, पुणे या कंपनीमार्फत प्रशिक्षित झालेल्या लीड ट्रेनर (सेवक) यांनी संस्थेच्या विभागानुसार सर्व शाखेतील सेवकांना प्रशिक्षण दिले आहे. याबाबत संस्थेने सिम्यु-सॉफ्ट टेक्नॉलॉजीज, पुणे यांच्याशी सामंजस्य करार केलेला आहे.

कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) साठी थेअरी व प्रॅक्टिकलच्या विषयानुसार Artificial Intelligence (AI), Machine Learning (ML), Internet of Things (IOT), Robotics, Coding इत्यादी अभ्यासक्रम दिलेला आहे. सन 2025-26 च्या प्रथम सत्रामध्ये थेअरीसाठी स्टडी मटेरियल (Books) संस्थेच्या सर्व शाखांना पुरविण्यात आलेले असून त्यानुसार प्रशिक्षण दिले जात आहे.

यासाठी माध्यमिक स्तरावर इ.५ वी ते इ.१० वी, इ.११ वी व १२ वी व वरिष्ठ महाविद्यालयानुसार कृत्रिम बुद्धिमत्ता विषयी अभ्यासक्रम तयार करण्यात आलेला असून त्यानुसार थेअरी व प्रॅक्टिकल दिले जात आहे.

गटनिहाय विद्यार्थी संख्याविद्यार्थी संख्या
शाखेतील इ. ५ वी ते इ.10 वी गटनिहाय समाविष्ठ एकूण विद्यार्थी संख्या४१९७६
शाखेतील इ.11 वी ते इ.12 वी गटनिहाय समाविष्ठ एकूण विद्यार्थी संख्या (माध्यमिक सलग्न उच्च माध्यमिक विद्यालये)३१०९
शाखेतील इ.11 वी ते इ.12 वी गटनिहाय समाविष्ठ एकूण विद्यार्थी संख्या (वरिष्ठ महाविद्यालय सलग्न कनिष्ठ महाविद्यालय)२१२१
वरिष्ठ महाविद्यालयातील समाविष्ट एकूण विद्यार्थी संख्या६१९१
महान एकूण विद्यार्थी संख्या५३३९७

गटनिहाय कृत्रिम बुद्धिमत्ता या अभ्यासक्रमासाठी सन २०२५-२६ मध्ये एकूण ५३३९७ विद्यार्थी प्रवेशित झालेले आहेत.