Rayat Shikshan Sanstha Logo

रयत शिक्षण संस्था

"स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद" - कर्मवीर

Karyakarta Logo

आंतरराष्ट्रीय/राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत यश

Sports Achievement 1
Sports Achievement 2
Sports Achievement 3

छत्रपती शिवाजी कॉलेज, साताराची खेळाडू कु. मधुरा धामणगावकर हिची जागतिक तिरंदाजी स्पर्धेत सुवर्ण पदकाला गवसणी!जागतिक तिरंदाजी स्पर्धा २०२६: पुबेला (मेक्सिको)

मेक्सिको मधील पुबेला येथे १२ एप्रिल रोजी झालेल्या जागतिक चषक तिरंदाजी स्टेज १ स्पर्धेत रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेज, साताराची आंतरराष्ट्रीय खेळाडू कु. मधुरा धामणगावकर हिचा समावेश असलेल्या भारतीय महिला तिरंदाजी संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत अमेरिकेच्या संघाचा २३३-२३२ अशा गुणांनी पराभव करत सुवर्णपदकाला गवसणी घातली.

या भारतीय महिला संघात मधुरा धामणगावकर, ज्योती वेंनाम, प्रगती चौधरी यांचा समावेश होता.

ओजस देवतळेला कास्यपदकाची हुलकावणी

या स्पर्धेत ओजस देवतळे याची मिश्र प्रकारात प्रगती चौधरीसोबत कास्यपदकासाठी लढत झाली, पण त्यात १५५-१५४ असा पराभव स्वीकारावा लागला.

कु. मधुरा धामणगावकर हिने ५ आंतरराष्ट्रीय स्पर्धांत २ सुवर्ण, १ रौप्य व २ कास्य अशी कामगिरी केली आहे.

ओजस देवतळे याने १ सुवर्ण व १ कास्यपदक मिळवले आहे.

श्री. प्रवीण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली दोघांनी भारतासाठी एकूण ७ पदके मिळवली आहेत.

भारत सरकारच्या क्रीडा मंत्रालयाच्या टार्गेट ऑलिम्पिक पोडीयम स्कीम (टॉप्स) मध्ये ओजस देवतळेचा समावेश झाला आहे.

पुढील स्पर्धा चीनमध्ये होणार असून कु. मधुरा आणि ओजस सहभागी होणार आहेत.

अ.न.शाखेचे नावविद्यार्थी / संघाचे नावखेळ / स्पर्धापदकस्तर
1धर्मवीर संभाजी विद्यालय, देहगाव-पाटेश्वरआर्या जयंतराव साळोखेकुस्तीसुवर्णराष्ट्रीय
2महात्मा गांधी विद्यालय, देहिगावनिशांत धनाजी जाधवकुस्तीसुवर्णराष्ट्रीय
3श्री भोजलिंग विद्यालय, जांभुळणीआर्या अभिनाथ काळे३००० मीटर शर्यतसुवर्णराष्ट्रीय
4मलोजीराजे विद्यालय, लोणंदमालोजीराजे विद्यालय व ज्यु. कॉलेज, लोणंदसॉफ्टबॉलसुवर्णराष्ट्रीय
5दहीवड महाविद्यालय, दहीवडसक्षम अर्जुन पवारबेसबॉलसुवर्णराष्ट्रीय
6एस.एस.जी.एम. महाविद्यालय, कोपरगावअरमान रझाक पठाणतायक्वांदोसुवर्णराष्ट्रीय
7एस.एस.जी.एम. महाविद्यालय, कोपरगावअफशा महेंद्रराव खडीबोटतायक्वांदोसुवर्णराष्ट्रीय
8एस.एस.जी.एम. महाविद्यालय, कोपरगावआविष्कार विठ्ठल जाधवतायक्वांदोसुवर्णराष्ट्रीय
9एस.एस.जी.एम. महाविद्यालय, कोपरगावशशिकांत लागू ढोकणेतायक्वांदोसुवर्णराष्ट्रीय
10एस.एस.जी.एम. महाविद्यालय, कोपरगावजयंता तारक समतातायक्वांदोसुवर्णराष्ट्रीय
11एस.एस.जी.एम. महाविद्यालय, कोपरगावश्रावणी किरुये निमसेतायक्वांदोसुवर्णराष्ट्रीय
12एस.एस.जी.एम. महाविद्यालय, कोपरगावकुश मनीष ओशवालतायक्वांदोसुवर्णराष्ट्रीय
13एस.एस.जी.एम. महाविद्यालय, कोपरगावजीत गोकुळ शिंदेतायक्वांदोसुवर्णराष्ट्रीय
14एस.एस.जी.एम. महाविद्यालय, कोपरगावकमलप्रसाद सोमनाथ सोनवणेतायक्वांदोसुवर्णराष्ट्रीय
15एस.एस.जी.एम. कॉलेज, कोपरगावश्रेयस तुळशीराम मोरेतायक्वांदोसुवर्णराष्ट्रीय
16साधना विद्यालय हडपसर, पुणे-28प्रशांत महादेव गोडसेवेटलिफ्टिंगसुवर्णराष्ट्रीय
17धनंजयराव गाडगीळ कॉलेज ऑफ कॉमर्स, साताराप्रतिक सुरेश जगतापखो-खोसुवर्णराष्ट्रीय
18धनंजयराव गाडगीळ कॉलेज ऑफ कॉमर्स, सातारापंकज अशोक जांबळेकुस्तीसुवर्णराष्ट्रीय
19धनंजयराव गाडगीळ कॉलेज ऑफ कॉमर्स, साताराप्रसाद महादेव पाटील, प्रणाली साहेबराव मोरे, वैष्णवी गणपत मोरेकुस्तीसुवर्णराष्ट्रीय
20धनंजयराव गाडगीळ कॉलेज ऑफ कॉमर्स, सातारासंजीवकुमार नागण्णासाहेबगुमाव्हॉलीबॉलसुवर्णराष्ट्रीय
Page 1 of 5