उत्कृष्टता केंद्र (Centre of Excellence - CoE) ही संकल्पना म्हणजे शिक्षण संस्था, उद्योग, संशोधन संस्था किंवा शासकीय विभागांमध्ये विशिष्ट क्षेत्रात कौशल्य, संशोधन, तांत्रिक क्षमता आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांवर लक्ष केंद्रित करणारे एक विशेष केंद्र होय.
अशा केंद्राचा उद्देश म्हणजे त्या विशिष्ट क्षेत्रात तंत्रज्ञान विकास, कार्यक्षम प्रशिक्षण, संशोधन व नवकल्पना यांच्यात प्रावीण्य मिळवणे. हे केंद्र म्हणजे ज्ञानसंपन्नता, नवोन्मेष आणि उद्योग-संस्था सहकार्याचे केंद्रबिंदू असते.








"AI, IoT, Robotics, Automation यांसारख्या क्षेत्रात बदलत्या औद्योगिक गरजांशी जुळवून घेण्यासाठी आणि नवीन तांत्रिक युगात भारताला सक्षम बनवण्यासाठी उत्कृष्टता केंद्रे ही काळाची गरज बनली आहेत."
हे CoE खास AI, ML, IoT, Robotics, 3D Printing, PLC, HPC यांसारख्या तंत्रज्ञानांवर आधारित आहे. विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानांचे थिअरी आणि प्रॅक्टिकल अंमलबजावणीचे प्रशिक्षण दिले जाईल.
Mechanical, Electronics आणि Computer Science विभागांचे समन्वयाने मेकाट्रॉनिक्स, ऑटोमेशन व डेटा सायन्स यावर आधारित प्रकल्प राबवले जातील.
CoE मधील 3D प्रिंटिंग आणि CNC सिम्युलेशन टूल्सच्या साहाय्याने डिजिटल डिझाईन ते मॅन्युफॅक्चरिंग पर्यंतचा प्रत्यक्ष अनुभव मिळेल.
AI आणि HPC प्रयोगशाळांमधून विद्यार्थ्यांना डेटा अॅनालिटिक्स आणि मशीन लर्निंग मॉडेलिंग शिकण्याची संधी मिळेल, जे Industry 4.0 मध्ये गरजेचे आहे.
उद्योगांसोबत केले जाणारे थेट प्रकल्प व इनोव्हेशन चॅलेंजेसमुळे 'real-world problem solving' संस्कृती तयार होईल.
संपूर्ण संस्था या CoE च्या माध्यमातून एक 'Digital Transformation Hub' बनू शकते. शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये प्रगत तांत्रिक विचारप्रणाली विकसित होईल.